मंगळावर ‘क्युरिओसिटी’ रोव्हर ने नेमके काय पाहिले?

माहितीचे काही दुवे:
महाराष्ट्र टाईम्स : मंगळावर दिसल्या उडत्या तबकड्या?
नासाच्या फोटोचे झालेले विश्लेषण (या दुव्यातील “The strange shimmering lights seen by Curiosity:” हा व्हिडिओ नक्की पहा. त्यात एक पांढरा ठिपका स्पष्टपणे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेलेला अगदी स्पष्टपणे दिसतोय

नासा : क्युरिओसिटी

पार्श्वभूमी:
अलिकडेच अमेरिकेच्या अंतराळ संशोधनाचा सर्व भार वाहणार्‍या ‘नासा’ या संस्थेमार्फत ‘क्युरिओसिटी’ रोव्हर ने घेतलेली काही छायाचित्रे सार्वजनिक केली गेलीत. त्या फोटोंपैकी एका फोटोत क्षितिजावर दिसत असलेल्या चार प्रकाशकणांचे अस्तित्त्व अनेकांना खटकले. कित्येकांच्या मते ते प्रकाशकण म्हणजे उडत्या तबकड्या (यु.एफ.ओ.) आहेत आणि दूर राहून मानवाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तर नासाच्या वतीने तो फोटोमधील एक तांत्रिक दोष असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

हा तो मूळ फोटो:

हे या मूळ फोटोचे (युएफओ च्या अस्तित्त्वासाठी पूरक असे – केलेले? -) पृथक्करणः

नासाच्या वैज्ञानिकांनी फोटोमधील तंत्रातील त्रुटीमुळे निर्माण झालेले डाग आहेत असे म्हटलेले आहे. (येथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नासाने ते ४ ठिपके अंतराळातील कोणत्यातरी तार्‍याचे असावेत असे अजिबात म्हटलेले नाहिये) फोटो पाहिल्यावर ते डाग आहेत असे वाटत नाही. कारण डागांना पसरणारा प्रकाश नसतो. ऐसी अक्षरे च्या सदस्यांचे या बद्दल मत काय आहे ते माहिती करुन घ्यायला आवडेल. येथे मी फक्त माहिती देतोय, माझी मते नाहीत. पुढे चर्चेत सहभागी होईनच.

मंगळावर यशस्वीपणे उतरुन एक इतिहास निर्माण करणार्‍या ‘क्युरिओसिटी’ या रोव्हर च्या या मोहिमेकडे अवघ्या जगातील शास्त्रज्ञांचे व काही प्रमाणात सर्वसामान्यांचेही लक्ष आहे. रोव्हर चा शब्दशः अर्थ भ्रमण करणारा वा फिरणारा असा होतो. समुद्री चाच्यांसाठी देखील हा शब्द वापरला जातो. त्यामुळे क्युरिओसिटी रोव्हर चे मराठी रुपांतर “जिज्ञासू भटक्या” अथवा “जिज्ञासू लुटारु” असे ढोबळमानाने करता येईल. अर्थात हा प्रस्तुत लेखाचा वा चर्चेचा महत्त्वाचा विषय नसल्यामुळे आपण ‘क्युरिओसिटी रोव्हर’ हाच शब्दप्रयोग करुयात. तर या धाग्याद्वारे ‘क्युरिओसिटी’ रोव्हरने काढलेल्या फोटोंवरून नव्याने कोणते वादळ बातम्यांच्या जगात गाजते आहे? आणि त्यात तथ्य किती आहे? अशा विषयावर चर्चा करुयात.

‘क्युरिओसिटी’ रोव्हर ची सविस्तर माहिती व ‘क्युरिओसिटी’ रोव्हर चे कार्य यापुरताच हा धागा चर्चेसाठी ठेवूयात. चर्चेच्या अनुषंगाने येणार्‍या तांत्रिक बाबी ठीक आहेत, पण एखाद्या तांत्रिक बाबीवर सविस्तर चर्चा हवी असेल तर त्यासाठी वेगळा धागा काढला जावा असे मला वाटते. उदाहरणार्थ – रोव्हर मधील कॅमेरा कॅमकॉम कसा आहे, त्याची क्षमता किती आहे, ही चर्चा धाग्यावर योग्य आहे. पण अंतराळातील सर्व प्रकारचे कॅमेरे व त्यांची माहिती हा वेगळ्या धाग्याचा विषय व्हावा.

हा युट्युबवरील व्हिडिओ ज्यामध्ये २४ व्या सेकंदानंतरचे दृश्य पहा. ज्यात अगदी स्पष्टपणे एक पांढरा ठिपका क्षितिजावरुन जाताना व क्षितिजाच्या मध्यावर लुप्त होताना दिसतो आहे.http://www.youtube.com/watch?v=BSVAq-Znxmk

सरासरी: