चार सूर्य असलेल्या ग्रहाचा शोध

 
 1
न्यू हेवन (कनेक्टिकट) – स्टार वॉर्स या हॉलिवुड चित्रपटांच्या मालिकांमधील आगळेवेगळे पशू, विविध प्रकारची अवकाश याने आणि विविध रंगांचे अनेक सूर्य असलेले ग्रह पाहून थक्क व्हायला होते. आता अशाच एका ग्रहाचा शोध लागला आहे. या ग्रहाला चक्क चार सूर्य आहेत. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील अवकाश विज्ञानात रुची असलेल्या दोन हौशी संशोधकांनी, प्लॅनेट हंटर या संकेतस्थळाच्या माध्यमातून असा ग्रह शोधून काढला आहे. कियान जेक आणि रॉबर्ट गॅग्लिआनो अशी या संशोधकांची नावे आहेत.
 
 2
कोणत्याही ग्रहाला चंद्र असतात हे आपण नेहमी वाचतो. पृथ्वीलाही एक चंद्र आहे. गुरूला तब्बल ६३, तर शनिला ६१ चंद्र आहेत. मात्र हे सर्व चंद्र ग्रहांभोवती आणि ग्रह सूर्याभोवती फिरत असतो. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांना केवळ एकच सूर्य आहे आणि सर्व ग्रह या सूर्याभोवती फिरतात. या तरुणवैज्ञानिकांनी शोधून काढलेल्या ग्रहाला चक्क चार सूर्य आहेत. दोन सूर्य ग्रहाच्याच कक्षेतच फिरत असतात, तर उर्वरित दोन सूर्य ग्रहाभोवती प्रदक्षिणा घाततात. या ग्रहाला पीएच-१ असे नाव देण्यात आले आहे.
 
पीएच-१ ला त्याच्या दोन सूर्यांची त्यांची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी १३८ दिवसांचा कालावधी लागतो. त्यातील एक सूर्य आपल्या सूर्यापेक्षा १.५ पट तर दुसरा ०.४१ पट मोठा आहे. ग्रहाभोवती फिरणाऱ्या सूर्यांना ग्रहाची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी २० दिवस लागतात.
 
 3
या ग्रहावरील तापमान २५१ अंश सेल्सियस ते ३४० अंश सेल्सियस असावे, असा अंदाज या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या ग्रहावर जीवन असण्याची कोणतीही शक्यता नाही.
  
पृथ्वीपासून हा ग्रह तब्बल ५ हजार प्रकाशवर्षे दूर आहे. तो पृथ्वीहून सहापट मोठा असल्याचा अंदाज आहे. आत्तापर्यंतच्या शोध लागलेल्या आकाशगंगांमधील ही सर्वांत लहान आकाशगंगा आहे.
 
चार सूर्य असूनही या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणावर त्यांचा कोणताच परिणाम कसा होत नाही, याचा शोध मात्र लागू शकलेला नाही. हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण असून, हौशी संशोधकांना प्रोत्साहन देण्यात यावे, अशी सूचना ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. ख्रिस लिनटॉट यांनी केली आहे.
 
अवकाशातील चमत्कार
– प्रकाशाचा वेग – प्रति सेकंद तीन लाख किलोमीटर
– १ प्रकाश वर्ष – निर्वात पोकळीतून एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर
– स्टार वॉर्स चित्रपटांमधून टॅटूईन नावाच्या काल्पनिक ग्रहावर दोन सूर्यांचा अस्त दाखविण्यात आला होता
– नासाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार अशा ग्रहांना द्वैती ग्रह (सरकम्बायनरी) म्हणतात
– अशा प्रकारच्या अन्य सहा द्वैती ग्रहांचा यापूर्वीच शोध
– चार सूर्य असलेला आतापर्यंतच्या अवकाश संसोधनाच्या इतिहासातील पहिलाच ग्रह
1 Planet 4 Suns

२०१३ साली आकाशात आयसॉन धूमकेतूचे राज्य

आकाशनिरीक्षकांसाठी एक चमकती भेटवस्तू नभांगणात प्रतीक्षा करीत आहे. तो आहे एक धूमकेतू. नव्यानेच शोधलेला हा धूमकेतू हा चंद्रापेक्षाही जास्त प्रकाशमान आहे असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काही खगोलवैज्ञानिकांनी केला आहे. 
रशियाच्या खगोलवैज्ञानिकांनी अलीकडेच २०१२ एस १ (आयसॉन) हा धूमकेतू शोधला असून, तो पृथ्वीपासून ९ कोटी किलोमीटर अंतरावर आहे, असे ‘नॅशनल जिऑग्राफिक’ या नियतकालिकाने म्हटले आहे. सध्या तो शनि व गुरू यांच्या दरम्यान असून फिकट दिसत आहे, पण जेव्हा तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने जवळ येईल त्या वेळी त्याच्यावरील धूळ व बर्फ निघून जाईल व त्याचा पिसारा अधिक प्रकाशमान दिसू लागेल. हा धूमकेतू मुळातच चमकदार असून, त्याचे सूर्यापासून अंतर कसे बदलत जाते यावर ते अवलंबून आहे असे भारतीय वंशाचे खगोलवैज्ञानिक रामिंदर सिंग सामरा यांनी सांगितले. तीन किलोमीटर रुंदीचा हा धूमकेतू असून २०१३ च्या शेवटच्या महिन्यांमध्ये व २०१४च्या सुरुवातीला तो अधिक प्रखर दिसेल. जर हे सगळे खरे ठरले तर तो खगोल इतिहासातील सर्वात तेजस्वी धूमकेतू ठरेल असे कॅनडाच्या एच. आर. मॅकमिलन अंतराळ केंद्रात काम करणारे सामरा यांनी ‘नॅशनल जिऑग्राफिक’ला सांगितले.
१६९०मध्ये एक महाधूमकेतू दिसला होता. त्याच्याच मार्गाने हा धूमकेतूही येत आहे. तो मंगळापासून १ कोटी किलोमीटर अंतरावरून जाईल व तेथील क्युरिऑसिटी या रोव्हरलाही त्याची काही सुंदर छायाचित्रे टिपता येतील. धूमकेतू किती प्रकाशमान दिसेल याबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे, कारण यापूर्वी असे अंदाज अनेकदा चुकले आहेत असे सामरा यांनी सांगितले.

माहितीचा स्त्रोत : लोकसत्तामधील बातमी

२२ नोव्हेंबर २०१३ रोजी पहाटे आयसॉन हा धूमकेतू ग्रेट ब्रिटन च्या आकाशात कस दिसेल त्याचे हे संकल्प चित्र 

ISON-On-Nov-22-2013before-dawn-from-UK

साधारणपणे १० डिसेंबर २०१३ च्या आसपास  ‘आयसॉन’ या धूमकेतूला आकाशात पाहण्यासाठी पुढील नकाशाचा उपयोग होईल   

ISON10thDec6am