खगोलीय अंतरे मोजण्याची एकके


१ प्रकाशवर्ष = ९४६०८०००००००० कि.मी. (म्हणजे प्रकाशाने १ वर्षात कापलेले अंतर)

खगोलशास्त्रात दोन तार्‍यांमधील वा दोन ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी आपली पृथ्वीवरची परिमाणे फारच थिटी पडतात.

उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर आहे – १४९५९७८०० किलोमीटर. आता बोला, किलोमीटर या एककात पृथ्वी ते सूर्य हे अंतर नक्की किती आहे हे आपल्याला समजून घेता येत नाही तर दोन तार्‍यांमधील अंतर कसे मोजता येईल?


ही अडचण ओळखून खगोलीय अंतराच्या मापनासाठी खगोलशास्त्रज्ञांनी “ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट” (खगोलीय एकक वा ज्योतिषीय एकक ) आणि “लाईट इयर” (“प्रकाशवर्ष“) या संकल्पना अस्तित्वात आणल्या
१ ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट = १४९५९७८००.६९१ कि.मी. (पृथ्वी ते सूर्य यांतील सरासरी अंतर )हे एकक मुख्यतः सूर्यापासून ग्रहाचे अंतर मोजण्यासाठी वापरतात.

हे एकक मुख्यतः तार्‍यांमधील अंतर मोजण्यासाठी वापरतात. (अर्थातच यासाठी बेस हा पृथ्वी आहे)

पृथ्वीपासूनच्या काही महत्त्वाच्या तार्‍यांची अंतरे:


तूर्तास एवढे पुरे. लवकरच नवीन माहीती दुसर्‍या लेखाद्वारे देईन

धन्यवाद,

सागर