२०१३ साली आकाशात आयसॉन धूमकेतूचे राज्य

आकाशनिरीक्षकांसाठी एक चमकती भेटवस्तू नभांगणात प्रतीक्षा करीत आहे. तो आहे एक धूमकेतू. नव्यानेच शोधलेला हा धूमकेतू हा चंद्रापेक्षाही जास्त प्रकाशमान आहे असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काही खगोलवैज्ञानिकांनी केला आहे. 
रशियाच्या खगोलवैज्ञानिकांनी अलीकडेच २०१२ एस १ (आयसॉन) हा धूमकेतू शोधला असून, तो पृथ्वीपासून ९ कोटी किलोमीटर अंतरावर आहे, असे ‘नॅशनल जिऑग्राफिक’ या नियतकालिकाने म्हटले आहे. सध्या तो शनि व गुरू यांच्या दरम्यान असून फिकट दिसत आहे, पण जेव्हा तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने जवळ येईल त्या वेळी त्याच्यावरील धूळ व बर्फ निघून जाईल व त्याचा पिसारा अधिक प्रकाशमान दिसू लागेल. हा धूमकेतू मुळातच चमकदार असून, त्याचे सूर्यापासून अंतर कसे बदलत जाते यावर ते अवलंबून आहे असे भारतीय वंशाचे खगोलवैज्ञानिक रामिंदर सिंग सामरा यांनी सांगितले. तीन किलोमीटर रुंदीचा हा धूमकेतू असून २०१३ च्या शेवटच्या महिन्यांमध्ये व २०१४च्या सुरुवातीला तो अधिक प्रखर दिसेल. जर हे सगळे खरे ठरले तर तो खगोल इतिहासातील सर्वात तेजस्वी धूमकेतू ठरेल असे कॅनडाच्या एच. आर. मॅकमिलन अंतराळ केंद्रात काम करणारे सामरा यांनी ‘नॅशनल जिऑग्राफिक’ला सांगितले.
१६९०मध्ये एक महाधूमकेतू दिसला होता. त्याच्याच मार्गाने हा धूमकेतूही येत आहे. तो मंगळापासून १ कोटी किलोमीटर अंतरावरून जाईल व तेथील क्युरिऑसिटी या रोव्हरलाही त्याची काही सुंदर छायाचित्रे टिपता येतील. धूमकेतू किती प्रकाशमान दिसेल याबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे, कारण यापूर्वी असे अंदाज अनेकदा चुकले आहेत असे सामरा यांनी सांगितले.

माहितीचा स्त्रोत : लोकसत्तामधील बातमी

२२ नोव्हेंबर २०१३ रोजी पहाटे आयसॉन हा धूमकेतू ग्रेट ब्रिटन च्या आकाशात कस दिसेल त्याचे हे संकल्प चित्र 

ISON-On-Nov-22-2013before-dawn-from-UK

साधारणपणे १० डिसेंबर २०१३ च्या आसपास  ‘आयसॉन’ या धूमकेतूला आकाशात पाहण्यासाठी पुढील नकाशाचा उपयोग होईल   

ISON10thDec6am

२७ नक्षत्रे : मराठी, ग्रीक आणि इंग्रजी नावे

मराठी मातीने अनेक नामवंत शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आपल्या भारत देशाला दिले हे खरे आहे. पण खगोलशास्त्राचा विस्तृत अभ्यास हा इंग्रजी भाषेत जेवढा झाला आहे तेवढा दुर्दैवाने मराठी भाषेत झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. आजच्या पिढीला बारा राशींची नावे इंग्रजीतूनच माहीत असतील आणि कदाचित मराठीतून १२ राशींची नावे सांगणे अवघडही जाईन. पण या १२ राशींचा आधार जी सत्तावीस नक्षत्रे आहेत त्यांच्या इंग्रजी नावाची ओळख करुन देणे हा या लेखाचा हेतू आहे. मधे एकदा मी एका संकेतस्थळावर मृग नक्षत्राच्या काक्षी तार्‍याच्या तांबूस रंगाबद्दल लिहिले होते. तर काक्षी ह्या नावाने काही लोकांना तार्‍याची माहिती कळालीच नाही. मी काक्षीला बेटेलग्युज असे म्हणताच … अरे हा तारा होय?… अशी प्रतिक्रिया मिळाली. अशा प्रसंगानेच मला हा लेख लिहायची प्रेरणा झाली असे म्हणावयास हरकत नाही… पुढे मी २७ नक्षत्रांची मराठी नावे व त्यापुढे ग्रीक व प्रचलित असणारी इंग्रजी नावे देत आहे …

येथे अजून एक लिहायचे राहिले. एकूण नक्षत्रे ही २७च आहेत, ज्योतिषिय गणितानुसार. पण “अभिजित” हे अठ्ठाविसावे नक्षत्र समजले जाते ते त्याच्या तेजस्वितेमुळे. अभिजित हा अगदी ठळक तारा आहे. आणि सत्ताविस नक्षत्रांबरोबर काही ज्योतिषि याचाही फलितासाठी विचार करतात. म्हणून या यादीत अभिजित पण दिला आहे. असे म्हणतात की अजून काही हजार वर्षांनी अभिजित हा पृथ्वीचा ध्रुवतारा होणार आहे

धन्यवाद,

सागर भंडारे.